इन विट्रो फ़र्टिलायझेशन (आय व्ही एफ़) चा वापर हा प्रामुख्याने आईच्या गर्भाशया ऐवजी अंड्यासह शुक्राणूचे फ़लन करून गर्भ पुन्हा आईच्या गर्भाशयामध्ये रुजविण्याकरिता केला जातो, ही प्रक्रिया अशा दामपत्यांकरिता केली जाते ज्यांच्यामध्ये वंध्यत्वाची समस्या किंवा एकापेक्षा अधिक वेळेला गर्भपात किंवा असफ़ल गर्भधारणा झालेली असेल.
आयव्हीएफ़-आयसीएसआयचा वापर हा त्यावेळेला केला जातो जेंव्हा पुरूषामध्ये वंध्यत्वाची समस्या असते किंवा मातेचे वय जास्त असते किंवा इतर काही समस्या असतात. आयसीएसआय हे इन्ट्रा सायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन असते ज्याचा वापर हा आयव्हीएफ़ प्रयोगशाळेमधील एम्ब्रियोलॉजिस्ट द्वारे उत्तम शुक्राणू चे अंड्यासह फ़लन होण्याकरिता केला जातो.
फ़लन सुधारण्याकरिता काही शस्त्रक्रिया केल्या जातात ज्यांना लॅप्रोस्कोपिक हिस्ट्रोस्कोपी असे म्हणतात, या शस्त्रक्रिया फ़ायब्रॉईड, एन्डोमेट्रियोसिस, पीसीओडी, अढेशन्स इत्यादी असल्यास केल्या जातात. आधुनिक आयव्हीएफ़ जसे एरा- एन्डोमेट्रियल रिसेप्टिविटी अरेचा वापर हा एकापेक्षा अधिक इम्प्लान्टेशन्स अपयशी झाले असल्यास इम्प्लान्टची योग्य वेळ जाणून घेण्याकरिता केला जातो.
दामपत्यांना गर्भधारणेकरिता मदत करण्या खेरीज, आयव्हीएफ़मुळे नोवा फ़र्टिलिटी सेंटर येथे वंध्यत्व तज्ञ आणि एम्ब्रियोलॉजिस्टसह अशा दामपत्यांची मदत केली जाते ज्यांच्याकडून त्यांच्या पाल्यांमध्ये अनुवंशिक आजार होण्याची संभावना असते आणि या समस्येविना मुल जन्माला येण्याकरिता पीजीटीचा वापर केला जातो.
आपल्याला गर्भधारणेकरिता मदत हवी असल्यास, त्याबद्दल खर्च किंवा उपचार पर्यायांसंबंधित मनात काही प्रश्न असतील तर आपण आर्थिक मदतीसह आयव्हीएफ़च्या खर्चाची माहिती ही आमच्या भारतभरातील 37 शहरांमधील कोणत्याही वंध्यत्व केंद्रातून मिळवू शकता. कृपया 1800 103 2229 वर आमच्याशी संपर्क साधा आणि आपली अपॉईंटमेंट नक्की करा.
आयव्हीएफ़ ही वंध्यत्व उपचार पद्धती असून गर्भधारणेची समस्या असलेल्या बऱ्याच महिला आणि दामपत्य विविध कारणांमुळे याची निवड करतात. आयव्हीएफ़ची शिफ़ारस ही एन्डोमेट्रियोसिस (गर्भाशयाच्या आतील भागावर असाधारण वाढ होणे), शुक्राणू किंवा
अंडयाची कमी किंवा असाधारण पद्धतीची फ़लन प्रक्रिया आणि अंडयाला किंवा शुक्राणूंना हानी पोहिचविणाऱ्या ॲन्टीबॉडीजच्या समस्यांकरिता केली जाते. अनुवंशिक समस्या असलेल्या रूग्णांना त्यांच्या मुलांमध्ये देखील त्या समस्या येतील का अशी भिती असेल, तर त्यांना देखील आयव्हीएफ़चा फ़ायदा होऊ शकतो.
नोवा फ़र्टिलिटी सेंटरमधील फ़लन तज्ञ आपल्याला हे नेमके सांगू शकतात की आपण आयव्हीएफ़, आयव्हीएफ़ – आयसीएसआय करिता प्रयत्न करू शकता का आणि आपल्याकरिता नेमकी उपचार पद्धती कोणती.
आमचा सहाय्यक आणि काळजी घेणारा समूह आपल्याला योग्य त्या वातावरण निर्मीतीसह आपले कौटुंबिक आयुष्य सुरू करण्याकरिताचे पर्याय उपलब्ध करून देतात. आयव्हीएफ़ शिवाय, आम्ही आपल्याला इंट्रायुटेराईन एन्सिमिनेशन (आययुआय) आणि आयव्हीएफ़-आयसीएसआय (इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन) सारख्या उपचार पद्धतीसुद्धा उपलब्ध करून देतो. आमच्यासह आपल्याला एका सायकलमध्येच आयव्हीएफ़ करता येऊ शकते, जिथे सगळ्या प्रक्रिया अगदी गर्भाच्या प्रत्यारोपणासह सगळे एकाच वेळेला केले जाते
अखेरीस, प्रजनन उपचार घेणे ही एक गुंतवणूकच असते. आमचे फ़लन तज्ञ आपल्याकरिता प्रत्येक उपचार प्रक्रिया निवडतात आणि आपले वय, त्यासह- दाम्पत्यांमधील इतर समस्या, पुरूषांच्या वंध्यत्वाच्या समस्या इत्यादीचा विचार करून नेमके पाऊल उचलतात. हे लक्षात घेणे फ़ार महत्वाचे आहे की एखाद्या दामपत्यास एकापेक्षा अधिक उपचार किंवा वंध्यत्वं उपचार पद्धती गर्भधारणा राहण्याकरिता आवश्यक वाटू शकतात. समजा फ़्रोजन एम्ब्रियो (गोठविलेले गर्भाशय) असेल तर त्याचे प्रत्यारोपण आणि काळजी घेण्याचा वेगळा खर्च असू शकतो.
आम्ही उपचार परवडणारा व्हावा याकरिता आमच्या रूग्णांच्या परिस्थितीचा विचार न करता शक्य तेवढी मदत करतो. विमा कंपन्यांकडून मिळणाऱ्या कव्हरेज मधून आम्ही फ़लन उपचार करण्याचा प्रयत्न करतो, त्यासह आम्ही तृतीय पक्षांद्वारे ईएमआय ऑफ़र देखील देतो.
नोव्हा आयव्हीएफमध्ये आयव्हीएफ-आयसीएसआयची किंमत 1.20 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 1.60 लाख रुपयांपर्यंत जाते.
यामध्ये 4 समुपदेशन आणि अल्ट्रासाऊंड स्कॅन, प्रक्रिया शुल्क, प्रयोगशाळा शुल्क, तज्ज्ञ शुल्क,नर्सिंग शुल्क आणि ओव्हम पिकअप आणि फ्रेश ट्रान्सफर दरम्यान रूग्ण शुल्क यांचा समावेश आहे. यात आयव्हीएफ औषधे, प्रजनन क्षमता वाढविणाऱ्या शस्त्रक्रिया, ईआरए (एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी ॲरे), पीजीटी, प्रजनन तज्ञांनी लिहून दिलेल्या नॉन-आयव्हीएफ औषधांचा खर्च समाविष्ट नाही. तसेच, प्रत्येक अतिरिक्त भ्रूण हस्तांतरणासाठी प्रयोगशाळा आणि प्रक्रिया कक्षाच्या वापर करण्यासाठी किमान खर्च येईल. भ्रूण गोठवण्याची किंमत अतिरिक्त आहे.
नोवा आयव्हीएफ़ला ईटी हेल्थवर्ल्ड फ़र्टिलिटी अवॉर्ड ज्युरीद्वारे 2021 वर्षाकरिताचा आयव्हीएफ़ चेन ऑफ़ द ईयर अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे.
नोवा आयव्हीएफ़मध्ये आम्ही आपल्या फ़लनासंबंधित गरजा समजून घेतो आणि आमचा आयव्हीएफ़ तज्ञांचा समूह, संपूर्णकालीन एम्ब्रियोलॉजिस्ट, सामुपदेशक आणि प्रशिक्षित फ़लन तज्ञ आणि परिचारिका आपल्या वंध्यत्वावर मातकरण्याच्या प्रवासामध्ये सतत आपल्या सोबत असतात आणि आयव्हीएफ़च्या माध्यमाने गर्भधारणेचा शक्य तेवढा प्रयत्न करतात .